New Shivneri Tarun Mandal, ShivGanesh Temple We WELCOME all Viewers and Devotees!

आमची प्रेरणा

न्यू शिवनेरी तरुण मंडळ

इवलेसे रोप लावियले द्वारी ! जाहला त्याचा वटवृक्ष !!

न्यू शिवनेरी तरुण मंडळाची स्थापना सन १९८२ च्या विजयादशमी रोजी झाली. आणि आज अखेर मंडळाने केलेल्या सामाजिक कार्याचा आढावा घेतल्यावरच वरील वाक्य अगदी तंतोतंत लागू होते. मंडळाच्या स्थापनेपासून चालू केलेले मोफत सार्वजनिक वाचनालय आजही लोकांना ज्ञानार्जनाचे घडेच्या घडे भरभरून देत आहे.

विधायक असे कार्य करतानाच मंडळाने मनोरंजनात्मक, शैक्षणिक, स्पर्धात्मक आणि विधायक कार्यक्रमावर नेहमीच भर दिला आहे. यामध्ये राष्ट्रीय सन, १५ ऑगस्ट, २६ जानेवारी, जयंती उत्सव असे अनेक कार्यक्रम राबवून वेगळेपणाचा ठसा उमटविला आहे. समाजातील गरीब विद्यार्थ्यांना वह्या वाटप, कपडे वाटप, रुग्णांना आर्थिक व मनुष्यबळ, अंध-अपंग, कुष्ठरोग्यांना दीपावली निमित्य फराळ वाटप या सारख्या कामांना प्राधान्य दिले आहे.

मंडळाने स्पर्धकांना उत्तेजन देण्याच्या उद्देशाने रांगोळी स्पर्धा, स्केटिंग स्पर्धा, सायकल स्पर्धा, सुंदर सही स्पर्धा घेऊन त्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्याचबरोबर मनोरंजनात्मक व प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविताना सोंगी भजनाच्या स्पर्धा, जादूचे प्रयोग तथा संगीत कार्यक्रम मोफत राबवून लोकांसमोर एक आदर्श निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.

विजयादशमीला मंडळाची स्थापना झाल्याने दरवर्षी हा दिवस मंडळाचा वर्धापनदिन म्हणून उत्साहाने साजरा केला जातो. सोने लुटण्याच्या कार्यक्रमाबरोबरच लहान मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम केला जातो.